Test Index

MAHA TET Exam 2025 Math and Science Paper Get it on Google PlayDownload on the App Store

Show Para  Hide Para 
Question Numbers: 25-27
दु:खे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टींतून तावून सुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही हे आपणाला माहीत नाही काय ? पैलू पाडल्याशिवाय हिऱ्यालासुद्धा किंमत येत नाही. आपणांवर कोसळणारी दु:खे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यासाठी निर्माण झाली आहेत असे आपण का समजू नये ? शिवाय असे पाहा, जगात दु:खे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना ? जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्त्व. त्याचप्रमाणे दु:ख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्त्व आहे असे तुम्हांला नाही वाटत ? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय ? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते, हे तुम्हांला माहीत आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का ? शिवाय दु:खांनंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही न्यारीच असते असा अनुभव कुणाला नाही ? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतर निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणांस कळते. असे जर आहे तर वर्तमानकाळाच्या दु:खाबद्दल आपण कुरकुर का करावी ? आणि दु:ख पर्वताएवढे असे का मानावे ?
Section: LI (Marathi)
© examsnet.com
Question : 25 of 150
Marks: +1, -0
Advertisements
Go to Question: