Test Index
MAHA TET Exam 2021 Math and Science Paper
Show Para
Question Numbers: 14-16खालील उतारा वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. दत्ताला अनेक गुरू होते. याचा अर्थ असा, की माणसाला शिकायचं असेल, तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात. जिज्ञासूला पर्वतातून प्रवचन आणि निर्झरातून संगीत ऐकायला मिळतं, असं पंडित नेहरूंनी सांगितलं आहे. परदेशी असताना असे अनेक मणी हाती लागले. 'या विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहात. करता येईल तितक्या लोकांना तुम्ही आनंदित करा', अशा आशयाची एक इंग्रजी कविता आहे. इटालियन माणूस तिचं शब्दशः पालन करीत आहे. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा तो प्रयत्न करतो. सुखद जीवन 'ला दोलचे व्हिता' - हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच झाला आहे. गोव्यात या वृत्तीला 'सुशेगाद' म्हणतात. पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा असावा.
Go to Question: